व्हाट्सअप ॲपवर लिंक पाठवून ग्राहकाच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांचा डल्ला!दीड लाख रुपयाची लुट, धाराशिव शहरातील घटना-Cyber Fraud Bank Account Customer

Hot Posts

6/recent/ticker-posts

व्हाट्सअप ॲपवर लिंक पाठवून ग्राहकाच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांचा डल्ला!दीड लाख रुपयाची लुट, धाराशिव शहरातील घटना-Cyber Fraud Bank Account Customer

व्हाट्सअप ॲपवर लिंक पाठवून ग्राहकाच्या बँक खात्यावर  सायबर चोरट्यांचा डल्ला!दीड लाख रुपयाची लुट, धाराशिव शहरातील घटना-


धाराशिव : व्हाट्सअप वर लिंक पाठवून बँक ग्राहकाच्या खात्यावर डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे ही घटना धाराशिव येथे घेतली या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शुक्रवार दिनांक 4 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 लूट व फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक ग्राहकासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील गोवर्धन वाडी येथील फिर्यादी आदित्य पांडुरंग भालेराव वय (23) यांना 19 एप्रिल रोजी 10 ते 11 व 20 एप्रिल रोजी आठ वाजेच्या सुमारास लिंक पाठवून फसवणूक केली फिर्यादीच्या मोबाईलवर रघुवीर बजाज शोरूम धाराशिव येथे अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईल वरून क्रमांक 87 14 36 36 57 या व्हाट्सअप वर लिंक पाठवली या लिंक च्या साह्याने अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मोबाईल हॅक केला व फिर्यादीच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून दीड लाख रुपये परस्पर काढून आर्थिक फसून केली. या प्रकरणी भालेराव यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास आनंद नगर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments