धाराशिव : उद्धव ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर; अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली आहे , या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते येत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, श्री. ठाकरे यांचा दौरा दुपारी सुरू होईल. ते सर्वप्रथम कळंब तालुक्यात भेट देतील.
असं असणार दौरा
1. दुपारी १२:३० वाजता: ईटकुर (तालुका कळंब) येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील.
2. दुपारी ०१:३० वाजता: पारगाव (तालुका वाशी) येथील नुकसानग्रस्त भागाला भेट देतील.
या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली असून, सर्वांचे लक्ष या पाहणी दौऱ्याकडे लागले आहे.

0 Comments