दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या कारणावरून तरुणाचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा धाराशिव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : लिफ्ट मागून पिकप मध्ये बसवलेल्या तरुणास दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून पैसे देण्यास नकार मिळतात लोखंडी रोडने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना नोव्हेंबर 2021 मध्ये धाराशिव तालुक्यातील गडदेवधरी पाटी जवळ शिंगोली शिवारास उघडकीस आली होती खून केल्यानंतर आरोपींनी तरुणाचा मृतदेह नग्न अवस्थेत टाकून देत पुरावा नष्ट करून पलायन केले होते परंतु डीएनए टेस्ट व तांत्रिक मुद्द्याच्या आधारे आनंद नगर पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून तीन आरोपींना निष्पन्न करत न्यायालयात खटला दाखल केला यामध्ये तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 11 हजार रुपये दंड थोतावला आहे.
सदरील गुन्ह्याची माहिती अशी की यातील मयत कृष्णा शिवशंकर कोरे ( राहणार गणेश नगर ढोकी तालुका धाराशिव )हा दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी एकूण धाराशिवला येण्यासाठी महिंद्रा पिकप क्रमांक Mh 44 86 84 मध्ये पॅसेंजर म्हणून बसला होता सदरील पिकप मध्ये आरोपी रमेश भगवान मुंडे वय (35) वर्षे अमोल अशोक मुंडे वय (31) दोघी राहणार कोयाल तालुका धारूर जिल्हा बीड व शिवशंकर हरिभाऊ इंगळे वय 27 राहणारी (इंगळे वस्ती तालुका केज जिल्हा बीड) हे तिघे अगोदरच बसलेले होते वरील तीन आरोपींनी आळणी पाटी चौकात कृष्णा कोरे यास पिकप मध्ये पाठीमागील बाजूस बसवून त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. यावेळी कृष्णाने पैसे देण्यास नकार दिल्याने सदर आरोपींनी लोखंडी सळईने कृष्णा यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर कृष्णाचा मोबाईल काढून घेत आरोपींनी कृष्णा यास गड देवदरी पाटी जवळ मोकळ्या मैदानात आणले .
यानंतर आरोपी शिवशंकर इंगळे हा तेथे थांबून राहिला व इतर दोन आरोपी रमेश मुंडे व अमोल मुंडे यांनी कृष्णाचे हात दोरीने बांधून त्याचा मोबाईल घेऊन शिंगोली येथील हॉटेल मेघदूत येथे येथे जात दारू पिले त्यानंतर दारू व इतर साहित्य पार्सल घेऊन हॉटेलची बिल कृष्णाच्या मोबाईलवरून फोन पे द्वारे पेड केली तसेच धाराशिव धाराशिवस्थानिक येथे जाऊन एका ऑटो रिक्षा चालकास कृष्णाच्या फोनवरून 3500 रुपये पाठवून त्याच्याकडून रोख स्वरूपात 3200 रुपये घेतले व परत गड देवधरी येथे दाखल झाले तेथे आरोपींनी कृष्णा कोरे याचा गळा दाबून व लोखंडी सळईने परत मारहाण करून खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या अंगावरील सर्व कपडे साहित्य सोबत घेऊन आळणी पाटी ते ढोकी रस्त्यावर रोडच्या कडेला टाकत फरार झाले .
गडदेवदरी पाटी जवळ कृष्णाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी पंचनामा करून जागेवरच दफनविधी केला दरम्यान ढोकी येथील मिसिंग केस व कृष्णाचा काही संबंध आहे का याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून काही अवशेष व आई-वडिलांच्या रक्ताची नमुने डीएनए तपासणीसाठी पाठव पाठवले त्याच्या अहवालातून मृतदेह हा कृष्णाचा असल्याचा समोर आले . त्यानंतर पोलिसांनी तपास दरम्यान वरील तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेत त्यांना शिक्षेपर्यत पोहचवले या प्रकरणात पोलीस निरीक्षक टीवी दराडे येथे जिंकले डीबी पारेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक बीके बलया ,प्रवीण कुमार बांगर ,आधुनिक तपास करून धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.औटे यांच्या कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले यावेळी समोर आलेले पुरावे 27 साक्षीदारांची जबाब व सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी रमेश भगवान मुंडे, अमोल अशोक मुंडे ,व शिवशंकर हरिभाऊ इंगळे या तिघांना दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी 11 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
ऑनलाइन बिलाचा आधार घेत आरोपींचा छडा
कृष्णाच्या मृतदेहाची ओळख पटली असली तरी खून कोणी व का केला ? हा प्रश्न होता याचवेळी बँक डिटेल्स तपासत असताना मेघदूत हॉटेलची बिल कृष्णाच्या बँक खात्यातून ऑनलाईन पेड झाल्याचे समोर आले त्यानुसार हॉटेलवर मालक मॅनेजर वेटर तसेच ऑटो रिक्षा चालक आदींची विचारपूस करून व सीसीटीव्ही फुटेज वरून आनंदनगर पोलिसांनी आरोपीचे धागेद्वारे मिळवत तिघांनाही गजाआड केली.

0 Comments