कळंब तालुक्यातील हसेगाव येथे रेणूकामाता नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा -Dharashiv District Kalanb News
कळंब, प्रतिनिधी/भिकाजी जाधव - तालुक्यातील हसेगाव (के) येथील रेणूकामाता नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात देवीच्या आरतीचा मान शिवसेनेचे नेते शिवाजी कापसे यांच्या सह अनेक मान्यवरांना व गावातील भक्तांनाही देण्यात आला. तसेच सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात 80 तरूणांनी रक्तदान करून विधायक कार्यात सहभाग नोंदविला हे दान केलेले रक्त भगवंत ब्लड बॅक बार्शी येथे सुपूर्द करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. दररोज मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महोत्सवाचे अध्यक्ष धुमाळ प्रथमेश, केशव यादव, पोपट यादव, नंदकुमार धुमाळ, शिवलिंग खरडकर, सुकाळे ऋषिकेश, सौरभ चवरे, संतोष यादव, अशोक आगलावे, अजय चौरे, बंटी काळे, अनिकेत धुमाळ, बालाजी यादव, शिवम धुमाळ, हरीओम भवर आदिनी प्रयत्न केले.
हसेगावचे माजी सरपंच विश्वंभर अप्पा पाटील यांनी ही दगडी मुर्ती वडवणी जिल्हा बीड येथून आणली असून 2018 मध्ये या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करतेवेळी रेणूकामाता माहुरगड, कोल्हापूर ची महालक्ष्मी व तुळजापूर येथील तुळजाभवानी मातांच्या मंदिरातून हसेगाव येथील तरूणांनी ज्योत आणल्या होत्या. तेंव्हापासून हसेगाव येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवून धार्मिक व सामाजिक संदेश दिला जातो भविष्यकाळात हा उत्सव आणखी मोठय़ा प्रमाणावर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजर करणार आहोत - किरण पाटील, मार्गदर्शक, रेणूकामाता महोत्सव. हसेगाव के ता कळंब.



0 Comments