विवाहतेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या पती,सासु, सासऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा धाराशिव येथील सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashiv Session Court Order

Hot Posts

6/recent/ticker-posts

विवाहतेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या पती,सासु, सासऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा धाराशिव येथील सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashiv Session Court Order

विवाहतेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या पती,सासु, सासऱ्यास सक्तमजुरीची शिक्षा धाराशिव येथील सत्र न्यायालयाचा निकाल-

धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे:  हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक त्रास देऊन विवाहतेस आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी आरोपी पती, सासू , सासऱ्यासह सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे तर धाराशिव येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश(Dharashiv Session Court ) एस.जी ठुबे यांनी गुरुवार दिनांक  25 रोजी हा निकाल सुनावला आहे.

याबाबत सरकारने तिला दिलेल्या अधिक माहितीनुसार औसा(Aausa Taluka)  तालुक्यातील शिवली येथील फिर्यादी शिवराज नामदेव सुरवसे यांची मुलगी 2012 रोजी खेलबा अनंतराव ढेकणे (राहणार जाधव वाडी तालुका धाराशिव ) यांच्याशी झाले होते तिला दोन अपत्ये झाली होती ; लग्नानंतर त्यांच्या मुलीला सासरच्या लोकांनी दोन वर्षे चांगले नांदवले परंतु त्यानंतर लग्नामध्ये ठरवल्याप्रमाणे राहिलेले एक तोळा सोने व पन्नास हजार रुपये तुझ्या आई-वडिलांकडून घेऊन ये म्हणून तिला आरोपी(Accuse Husband)  पती खेलबा ढेकणे, सासू शोभा ढेकणे, सासरा अनंत ढेकणे ,चुलत सासरा बिरू ढेकणे ,नणंद अमृता ढेकणे ,दीर सुग्रीव ढेकणे सर्व राहणार जाधववाडी यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच मारहाण करून पैसे व सोने घेऊन ये म्हणून तिला घरातून हाकलून दिले त्यानंतर नातेवाईकामार्फत सासरच्या लोकांना समजावून सांगूनही त्यांनी राणी हिचा शारीरिक व मानसिक छळ केला राणी हिने 25 ते 26 जुलै 2016 या कालावधीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली अशी फिर्याद्री सुरवसे  यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात(Dharashiv Rural Police Station)  दिली होती .या प्रकरणी पतीसह सासरच्या अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता . त्यानुसार पोलीस निरीक्षक (PSI) जी.एस गायकवाड यांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल केले या प्रकरणाची सुनावणी तत्कालीन सत्र न्यायाधीश(Judge) आर.एस गुप्ता यांचे न्यायालयात झाले या प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद सत्र न्यायाधीश श्री ठुबे यांच्या न्यायालयात पूर्ण झाला . सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात  आले; साक्ष(Witness) पुराव्यानंतर समोर आलेली बाजू व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता  सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पती खेलबा ढेकणे सासू शोभा ढेकणे ,सासरे आनंद ढेकणे यांना दोषी ठरवून निकाल सुनावला पती खेलबा यास 9 वर्षाची शिक्षा सासरा अनंत व सासू सोबत ढेकणे या 7 वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली चुलत सासरा बिरू ढेकणे ,नणंद अमृता ढेकणे ,दीर सुग्रीव ठेकणे यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे .या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल(Police head constable) कोठावळे व श्री कुंभार यांनी काम केले.



Post a Comment

0 Comments