संतापजनक घटना : चॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; नराधम आरोपीस अटक धाराशिव जिल्ह्यातील घटना-Outrageous incident minor girl tortured by luring her with chocolate;

Hot Posts

6/recent/ticker-posts

संतापजनक घटना : चॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; नराधम आरोपीस अटक धाराशिव जिल्ह्यातील घटना-Outrageous incident minor girl tortured by luring her with chocolate;

संतापजनक घटना : चॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; नराधम आरोपीस अटक  धाराशिव जिल्ह्यातील घटना-


धाराशिव प्रतिनिधी /रुपेश डोलारे: भूम तालुक्यातील एका गावामध्ये एका आठ वर्षीय चिमुकलीवर एका 55 वर्षीय नराधमाने चॉकलेटचे अमिषा दाखवून लैंगिक अत्याचाराच्या(Sexully Assult) केल्याची धक्कादायक घटना दिनांक 23 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात(Bhum Police Station)  आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संतापजनक घटनेमुळे (Outrageous incident ) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की भूम तालुक्यातील एका गावातील सात वर्षे 11 महिन्याची लहान चिमुकली (Minor Girls)इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे गावातीलच एका 55 वर्षीय नराधमाने दिनांक 23 रोजी त्यांचे चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्याशी ओळख निर्माण करून जवळीक साधली त्यानंतर बुधवार दिनांक 24 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ती चिमुकली शेताकडे आजोबांकडे(Grandfather) मक्याचे कणीस आणण्यासाठी चालली असता आरोपीने तिला गावातील चौकातून चॉकलेटचे (Chocolate)आमीष दाखवत ओढ्याकडे नेले. त्यानंतर तिथे आरोपीने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी रडून चिमुकलीने स्वतःची कशीबशी सुटका करून घराकडे धाव घेतली तिने घडलेला संपूर्ण प्रकार आईला (mother)सांगितला आईने हा प्रकार कुटुंबिया सांगितल्यानंतर गावातील काही तरुणांनी त्या चिमुकलीला व तिच्या कुटुंबांना घेऊन भूम पोलीस ठाणे गाठले तसेच त्या चिमुरडीवर तात्काळ उपचार (Treatment)करून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गावातील तरुणांनी व बीट अंमलदार यांनी ही सर्व माहिती पोलीस निरीक्षक(PSI) श्री गणेश कानगुडे यांना सांगितली त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आरोपी(Accuse) नराधमास अटक केली आहे या घटनेचा अधिक तपास भूम पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments