संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव मदत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय-
मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य एक हजार रुपयाची वाढ करण्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते आता ते अडीच हजार रुपये दिले जाणार आहे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये जात असल्याने निराधार महिलांना तसेच दिव्यांगाच्या रकमेत वाढ करावी अशी मागणी करण्यात येत होती त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथी ग्रहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात वरील निर्णय घेण्यात आला. राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष ,महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग निराधार विधवा आदींना दर महा पंधराशे रुपये अर्थसाह्य दिले जाते सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत चार लाख 50 हजार 700 आणि श्रावण बाळ योजनेत 24 हजार 3 दिव्यांग लाभार्थी आहेत.धडधाकट लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये देतातच सरकार वयस्कर व निराधार महिलांना आणि दिव्यांगाने त्याच्यापेक्षा किमान हजार रुपये तरी जास्त द्यावेत अशी मागणी अनेक स्वयंसेवी संस्था व विविध समाज घटकांकडून करण्यात येत होती त्यानुसार शासनाने या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आहे हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

0 Comments