बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने डोक्यात गोळी घालून स्वत:ला संपवलं- उपसरपंच बीड जिल्ह्यातील-Solapur Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने डोक्यात गोळी घालून स्वत:ला संपवलं- उपसरपंच बीड जिल्ह्यातील-Solapur Crime

बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने डोक्यात गोळी घालून स्वत:ला संपवलं- उपसरपंच बीड जिल्ह्यातील-Solapur Crime 

सोलापूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे: जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. पण नेमकं काय झालं? माजी उपसरपंचाने टोकाचं पाऊल का उचललं? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लोखामसला गावचे रहिवासी असलेली माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय (34) यांना लोकनाट्य कला केंद्र मध्ये कला पाहण्याची आवड होती सुमारे एक-दीड वर्षांपूर्वी थापडीतांडा येथील कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड या नर्तिकेसोबत त्यांची ओळख झाली होती हळूहळू तिचा प्रवास जसा पारगाव कला केंद्राकडे वळला तसे त्यांच्यातील मैत्रीचे संबंध प्रेमामध्ये गुंतले यातून अनेक आर्थिक व्यवहार त्यांच्यामध्ये घडल्याची बर्गे यांच्या नातेवाईकाकडून कळते. 

सोन्याच्या दागिन्यासह पूजाला गोविंद यांनी सुमारे पावले दोन लाख रुपयांचा एक मोबाईल देखील दिला होता त्यांचे प्रेम प्रकरण वाढत असतानाच अचानक पूजाने गोविंदाशी संपर्क तोडल्यामुळे तो नैराश्याच्या अवस्थेत जाऊ लागला ;दरम्यान त्यांनी वेळोवेळी तिच्याशी संपर्क साधून पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मात्र यास पूजा प्रतिसाद देत नव्हती त्यामुळे गोविंदाने गेवराईवरून पूजेचे गाव म्हणजे बार्शी तालुक्यातील सासुरी वैराग येथे सोमवारी मध्यरात्री गाठले दरम्यान सासुरे येथील पोलीस पाटील शितल करंडे यांनी वैराग पोलिसांना फोन करून सांगितले की प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक चार चाकी गाडी क्रमांक एम एच 23 बीएस 50  20 लावली असून गाडीमध्ये एक ही इसम मयत अवस्थेत आढळून आला आहे सोबत एक पिस्टल देखील दिसत आहे वैराग पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

 याबाबतची सखोल चौकशी करतात प्रशांत गायकवाड यांनी मयत व्यक्ती गोविंद जगन्नाथ बर्गे हा असून माझ्या बहिणीस भेटण्यास आला आहे असे सांगितले मात्र तो कधी आला आहे याची मला कल्पना नसून मी सकाळी त्याला पाहिले असे सांगितले

दरम्यान पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले असता गाडी लॉक आढळून आली यासाठी पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून दुसरी चावी मागून गाडीचे लॉक काढले तेव्हा गाडीमध्ये पुंगळी आढळून आली. या पिस्टल ने गोळी मारून घेत गोविंदाने स्वतः आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज उपविभागी पोलीस अधिकारी अशोक सायकल यांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर बार्शीचे उपयोगी पोलीस अधिकारी अशोक सायकर वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे साहेब ,पोलीस निरीक्षक विश्वजीत जगदाळे यांनी भेट दिली यावेळी सोलापूरच्या फॉरेन्सिक नमुने गोळा केले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळे करीत पाठवले आहेत परदेशी बनावटीचे पिस्टल देखील जप्त करण्यात आले असून यातून एक गोळी फायर करण्यात आल्याचे समोर आले आहे. बाकी मॅक्झिन खालीच होते घटनेनंतर गोविंद यांचे पार्थिव बार्शीच्या ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदनाकरता पाठवू नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले.

 दरम्यान या घटने संदर्भात वैराग पोलिसांनी अत्यंत सावधगिरी तपास करण्यास सुरुवात केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती दरम्यान या प्रकरणांमध्ये वापरण्यात आलेले पिस्टल हे विनापरवाना असल्याची प्रथमदर्शनी आढळून आली असून कुठून कसे आले याबाबतचा तपास पोलीस यंत्रणा तपास करत आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत जगदाळे हे करत आहेत.

रात्री मित्रांनी केला होता ग्रुप कॉलिंग

ही घटना घडण्यापूर्वी रात्री दहाच्या सुमारास गोविंदाच्या दोन मित्रांनी ग्रुप कॉलिंग करून रात्री प्रवास करू नकोस हट्ट सोड अशी चर्चा देखील केली होती; मात्र गोविंदने कोणाचे ऐकले नाही आणि सकाळीच मित्रांना आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समजले त्यामुळे मित्रांना देखील धक्का बसला असून ते तात्काळ घटनास्थळी हजर झाले अत्यंत कष्टाळू असलेल्या गोविंदाने गेवराई मध्ये मोठी घर बांधले होते या घराची वास्तुशांती देखील अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच करण्यात आली होती गोविंद हा विवाहित असून त्याला इयत्ता नववीत शिकणारी एक मुलगी असून इयत्ता सहावी मध्ये शिकणारा मुलगा देखील आहे गोविंदाच्या या निर्णयामुळे मात्र बर्गे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या निरागस मुलांचा आधारवड हरपला आहे.


Post a Comment

0 Comments