हृदय द्रावक घटना : पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या धाराशिव जिल्ह्यातील घटना-Wife muder Husband Suicide Dharashiv News

Hot Posts

6/recent/ticker-posts

हृदय द्रावक घटना : पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या धाराशिव जिल्ह्यातील घटना-Wife muder Husband Suicide Dharashiv News

हृदय द्रावक घटना : पत्नीची निर्घृण  हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या धाराशिव जिल्ह्यातील घटना-


धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : तालुक्यातील कोल्हेगाव येथे रविवारी दि, ७ रोजी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. यामध्ये गावातील रहिवासी श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय अंदाजे 35 वर्षे) याने आपल्या पत्नीला किरकोळ वादातून बेदम मारहाण केली यात  पत्नी गंभीर जखमी होऊन मृत पावली त्यानंतर स्वतः पतीने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील दोन महिन्यापासून दाम्पत्य आत्महत्येच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनेने कोल्हे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार , धाराशिव तालुक्यातील कोल्हे गाव येथील श्रीकृष्ण टेकाळे यांचा विवाह सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी झाला होता. पत्नी साक्षी श्रीकृष्ण टेकाळे (वय 28 ) हिच्यासोबत कोल्हेगावात राहत होते. रविवारी सकाळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने श्रीकृष्ण यांनी पत्नीला मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी होऊन मृत पावली. त्यानंतर मानसिक तणावाखाली येत श्रीकृष्ण याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. प्राथमिक चौकशीत घटनास्थळावरून एक चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याचे समजते. मात्र त्या चिठ्ठीतील मजकूर उघड करण्यात आलेला नाही. या घटनेमागे , नेमकी काय कारण असावे  हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे.तरुण दाम्पत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कोल्हेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी  मोठी गर्दी केली होती. टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Post a Comment

0 Comments