अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला नैराश्यातून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या तुळजापूर तालुक्यातील घटना -
तुळजापूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे : मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी खरीपातील लागवडीसाठी केलेल्या खर्च निघणे अशक्य झाले आहे यामुळे शेतकरी हतबल झाला असून आत्महत्या सारखी टोकाचे पाऊल उचलत आहेत, अशीच घटना तुळजापूर तालुक्यातील अंदुर येथे दिनांक 30 रोजी घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेले अधिक माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांची झालेली नासाडी आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक विवेंचनेतून शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 30 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली .उमेश सूर्यकांत ढेपे वय (४५) असे मयत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून पिकाची मोठे नुकसान झाले आहे उमेश ढेपे यांच्या शेतातील ऊस अतिवृष्टीमुळे आडवा पडला तर सोयाबीन पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. शेतीसाठी विहीर पाईपलाईन आधी कामासाठी तसेच संसारासाठी त्यांनी उसनवारी केली होती मात्र सततच्या अतिवृष्टी पावसामुळे शेतीतून काहीच उत्पन्न मिळाले नाही आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे? या चिंतेतून प्रचंड मानसिक तणावात होते यातूनच त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल.ढेपे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले , एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे यामुळे जिल्हा परिसरात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहेत .यावर सरकारने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत.

0 Comments