लग्न मोडल्याच्या रागातून एकावर तलवारीने हल्ला;आठ जणाविरुध्द गुन्हा दाखल -
बीड /प्रतिनिधी रूपेश डोलारे : केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावात लग्नाच्या कारणावरून शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये वाद झाला तलवारीने वार केल्याने एक जण जखमी झाला असून आठ जणाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे केज पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कोलेवाडी येथील सदाशिव भगवान आंधळे हे त्यांच्या पत्नी व मुलासह घरी जेवण करत होते त्यावेळी भावकीतील गोरख उर्फ विकास अशोक आंधळे हा दारूच्या नशेत त्यांच्या घरासमोर येऊन शिव्या देऊ लागला सदाशिव आंधळे घराबाहेर आले तेव्हा गोरख यांनी तुम्ही लग्न का मोडले? असे विचारणा करत त्यांच्यावर तलवारीने वार केला या हल्ल्यात सदाशिव यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या भांडण शांत करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलालाही गोरख यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली या प्रकरणी सदाशिव आंधळे यांच्या फिर्यादीवरून गोरख उर्फ अशोक आंधळे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच प्रकरणी पार्वती अशोक आंधळे यांच्या फिर्यादीवरून दुसऱ्या गटावर गुन्हा दाखल झाला शुक्रवारी रात्री दहा वाजता पार्वती आंधळे आपल्या घरी असताना विष्णू सदाशिव आंधळे यांनी येऊन दार वाजवले घरी कोणीही नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर विष्णू आंधळे तेथे निघून गेला त्याचा मुलगा गोरख उर्फ विकास आंधळे हा घरी आल्यावर त्याला हा प्रकार समजताण, तो विष्णू आंधळेच्या घरी विचारणा करण्यास केला असता विष्णू आंधळे, सदाशिव आंधळे ,समाबाई आंधळे, केशर मिसाळ, मुंजा मिसाळ ,राजेभाऊ मिसाळ ,भाऊसाहेब आंधळे यांनी त्याला लाथा बुक्क्यांनी व चापटांनी मारहाण केली ;त्यानंतर पार्वती आंधळे यांना घरी घेऊन शिवीगाळ केली पार्वती आंधळे यांच्या फिर्यादीवरून सात जणाविरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल उगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे करत आहेत.

0 Comments