मौजे इटकळ येथे नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
"""""”"""""""""""""""""""""""""""""""""""""
आई राजा उदो उदो च्या जय घोषाने परिसर दणाणून गेला.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मौजे इटकळ येथे जय माता दी तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या १७ वर्षापासून जय माता दी तरुण मंडळाच्या वतीने इटकळ येथे नवरात्र महोत्सव धार्मिक व सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रम त्यामध्ये भजन, कीर्तन,आराधी मंडळ गाणी, भारुड, देवीचे माहात्म्य आदि कार्यक्रम घेण्यात आले. गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक व्यापारी विविध संघटनेचे पदाधिकारी आदि मान्यवरांचा जय माता दी मंडळाच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला त्या नंतर सिमोलांघाने या नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी विद्युत रोषणाईसह फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. हा नवरात्र महोत्सव कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

0 Comments