दुर्दैवी घटना : पाणी तापवण्याच्या हिटरचा शॉक लागून गर्भवती महिलेचा मृत्यू धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Ter Villege Incident Heater

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : पाणी तापवण्याच्या हिटरचा शॉक लागून गर्भवती महिलेचा मृत्यू धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Ter Villege Incident Heater

दुर्दैवी घटना : पाणी तापवण्याच्या हिटरचा शॉक लागून गर्भवती महिलेचा मृत्यू  धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Ter Villege Incident Heater


धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : धाराशिव तालुक्यातील तेर येथे एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेचा पाणी गरम तापविताना  हिटर लावत असताना विजेचा  शॉक  लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दिनांक ३ रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील(Dharashiv)  तेर येथील विठ्ठल नगर येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन जीवांचा अंत झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील तेर येथील विठ्ठल नगर भागातील रहिवासी शितल विजय वैद्य वय (26) या शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अंघोळीला पाणी गरम करण्यासाठी प्लास्टिकच्या बकेट मध्ये हिटर ठेवून लाईटच्या बोर्डातील पिन लावत होत्या यावेळी वायर कट असल्यामुळे प्रथम त्यांच्या हाताला जोराचा विजेचा शॉक लागल्याने पायरीवर कोसळल्या व यातच त्यांचा मृत्यू झाला. मयत शितल वैद्य या आठ महिन्याच्या गर्भवती होत्या या दुर्घटनेत आईसोबत आठ महिन्याच्या गर्भातील बाळाचाही अंत झाल्याने तेर परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी दत्तात्रय दादाराव वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस स्टेशन(Dhoki Police Station)  मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याप्रकरणी या घटनेचा तपास ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या आदेशानुसार पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल माळी हे करत आहेत. अशा दुर्घटना परत घडू नये यासाठी नागरिकांनी घरगुती विजेच्या उपकरणाचा वापर करत असताना नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments