गुरु शिष्याच्या नात्याला - शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार सेलु शहरातील घटना- Guru-disciple relationship - Teacher sexually assaults minor girl in Selu city incident

Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरु शिष्याच्या नात्याला - शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार सेलु शहरातील घटना- Guru-disciple relationship - Teacher sexually assaults minor girl in Selu city incident

संतापजनक : गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा - शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला अत्याचार आरोपी शिक्षकासह अन्य तीन जणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल 


परभणी /प्रतिनिधी रूपेश डोलारे  : सेलु शहरातील एका नामांकित शाळेतील 45 वर्षीय  शिक्षकाने 16 वर्षीय  अल्पवयीन विद्यार्थीनीवर(Minor student Girls)  अत्याचार केल्याबाबत तक्रार पीडित कुटुंब  शुक्रवार दिनांक 3 रोजी रात्री अकरा वाजता सेलु पोलीस ठाण्यात केली त्याआधारे पोलिसांनी शिक्षक व अन्य तीन जणावर पोस्को अंतर्गत(Posco) गुन्हा दाखल करून तीन आरोपींना ताब्यात घेतली असून त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन(Minor Accuse)  असून एक अनोळखी  आरोपीचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सेलू शहरातील(Selu City) नामांकित असलेल्या नटून शिक्षण संस्थेला काळा डाग लागला असून गुरु शिष्याचे नात्याला कालीमा फासणारी या कृत्यामुळे शिक्षकाचे अनेक किस्से समोर येत आहेत वेळेत संस्थेने समज दिली असती तर आज हे दिवस पाहण्याची वेळ आली नसती यावरून संस्थेत काय चालले याकडे संस्थाचालकाची सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे संस्थेला गालबोट लागले . अशी चर्चा स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सेलू(Selu) शहरातील एका फ्लॅटमध्ये पीडित व शिक्षक यांचे वास्तव्य होते शेजारी असल्याने त्यांचे चांगले  संबंध होते पीडित अल्पवयीन मुलीचे अश्लील  फोटो चोरून काढून शारीरिक संबंधाची मागणी करून सातत्याने पीडित विद्यार्थीचा पाठलाग केला जाऊ लागला पीडित विद्यार्थिनी त्रस्त झाल्याने कुटुंबाला प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर कुटुंबाने शुक्रवार दिनांक 3 रोजी शेलू पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस असे मत सर्व हकीगत सांगितली त्यानंतर पोलिसांनी पीडित कुटुंबयांची रीतसर तक्रार दाखल करून घेऊन आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणी आरोपी नूतन विद्यालय येथील शिक्षक संतोष बबनराव मरसटवार वय (45) अल्पवयीन मुलगा नितीन परदेशी वय (20) आणि एक अनोळखी  अशा चार जणांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी घटनेची तीव्रता पाहता शिक्षक व अन्य दोघांना ताब्यात घेतली असून त्यातील एक अल्पवयीन असून एक अनोळखी असल्याने त्याच्या शहरासाठी पोलीसाची शोध पथक स्थापन करण्यात आली आहे गुन्हा(Offence Register) दाखल करण्यासाठी पीडित कुटुंबाला पोलीस महानिरीक्षक यांना फोन करावा लागला असल्याची चर्चा होत आहेत. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनेक बडे राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले पण अपयश आले यावरून तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत असून त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला जागी व्हावी लागेल अशी चर्चा सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे.शिक्षकांनी असे  दुष्कृत करून शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याने  विद्यार्थिनी व पालक वर्गातून गुरुजी तुम्ही सुद्धा...... असाच सूर निघू लागला आहे.

शिक्षक म्हटले की पालकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असतो पण अशा कथाकथित शिक्षकाचे दुष्कृत्य करून शिक्षक जातीला काळी माफ असणारी कथाकथ अनेक शिक्षकाचे किस्से गुन्हा दाखल झाल्यानंतर बाहेर पडू लागले आहेत अशा शिक्षकाला संस्थेत मोठा मान सन्मान देण्यात येत असून मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालन गायक प्रशासनाचे उत्तम ज्ञान असलेल्या शिक्षक म्हणून कमी वेळात नावलौकिक कमावले होते पण एका क्षणात सर्व गमावावे लागले.

Post a Comment

0 Comments