संताप जनक घटना: अल्पवयीन दिव्यांग मुलीवर सामूहिक अत्याचार एका आरोपीस अटक अन्य आरोपीचा शोध सुरू धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची संताप जनक घटना घडली आहे. घरासमोर पडवीत झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीस पाच जणांनी उचलून जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला यावेळी आरोपीने घरात झोपलेल्या कुटुंबियांना बाहेर पडता येऊ नये याकरता दरवाजास बाहेरून कडी लावली होती. ही घटना दिनांक 16 रोजी रात्री घडली असून या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे अन्य आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पिढीत अल्पवयीन दिव्यांग मुलगी रात्री कुटुंबीयासह जेवण करून झोपी गेली होती यावेळी पीडिता व तिची बहीण घरात जवळील पडवीत तर इतर सदस्य घराच्या खोलीत झोपली होती. दिनांक 16 च्या मध्यरात्री तेथे आलेल्या पाच आरोपींनी कुटुंब झोपलेल्या खोलीचा दरवाजास बाहेरून कडी लावत घरावर दगडफेक केली त्यानंतर घराबाहेर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला दरम्यान पिडीतेच्या बहिणीने घराची कडी उघडल्याने इतर सदस्य बाहेर आले ;दरम्यान अल्पवयीन मुलीस उचलून नेताना दोन महिलांनी पाहिले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी तात्काळ शोध घेतला असता ती मुलगी शेजारील शेतात अर्धवट कपड्यांमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले मुलीने शुद्धीवर आल्यानंतर घडला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला त्यानंतर पीडित कुटुंबयांनी 112 वर कॉल केल्यानंतर भूम पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत घटनेचा पंचनामा केला.
याप्रकरणी लाल्या गोवर्धन काळे ,अमित गोवर्धन काळे, बापू लिंग्या काळे, लंग्या साहेबराव काळे ,अशोक बाळू पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे हे सर्व संशयित परंडा जामखेड व अहिल्यानगर परिसरात आहेत. याप्रकरणी घरपोडी धमकी शारीरिक हल्ला बालकाची लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम पोस्को अत्याचार व लैंगिक छळ व अपंग व्यक्ती अधिकार नियमानुसार भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पीडीतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे भूम पोलिसांनी यातील अमित काळे राहणार चिंचपूर बुद्रुक तालुका परंडा यास ताब्यात घेतले आहे इतर आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

0 Comments