सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर आठ महिन्यापासून लैंगिक अत्याचार तरुणावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस घराच्या पाठीमागे असलेल्या बांधकामात नेऊन अत्याचार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पोस्को(Posco Act) कायद्याअंतर्गत व इतर कलमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही धक्कादाय घटना मागील आठ महिन्यापासून घडत आली असून याप्रकरणी दिनांक 24 रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस(Minor Girl Sexully Assult) गावातीलच एका तरुणाने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी घरामागे असलेल्या अर्धवट बांधकाम चालू असलेल्या घरात नेऊन लैंगिक अत्याचार केला; तसेच आरोपी तरुणांनी मागील आठ महिन्यापासून सदरील ठिकाणी पीडित अल्पवयीन(Minor Girl) मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देत सातत्याने तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणी पीडित मुलीने दिनांक 24 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याचा अधिक तपास शिराढोण पोलीस(Shiradhon Police Station) करत आहेत. या संताप जनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

0 Comments