दुर्दैवी घटना : स्कुटी मध्ये ओढणी अडकून महिलेचा मृംत्यू-
नांदेड : किनवट तालुक्यातील बोधडी येथील प्रतिष्ठित गुत्तेदार रवी चव्हाण यांच्या पत्नी मालाताई रवी चव्हाण वय (32) यांचे अपघाती निधन झाले या घटनेने सर्वत्र व्यक्त होत आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालाताई चव्हाण या दिवाळी सणासाठी आपल्या माहेरी विदर्भातील कारंजा लाड येथे गेल्या होत्या रविवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी ते आपल्या वडिलांसोबत बाजारात सणासुदीची खरेदी करण्यासाठी स्कुटी वरून जात असताना त्यांची ओढणी स्कुटीच्या चाकात अडकली आणि त्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पती रवी चव्हाण मुलगी मुलगा सासू-सासरे आणि दीर असा परिवार आहे माला चव्हाण यांचे पार्थिव रविवार रात्री उशिरा बोधडी येथे आणण्यात आले सोमवार दिनांक 27 रोजी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आहे.

0 Comments