कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या मार्गावर ४ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान वाहनांना प्रवेशबंदी; वाहतूक मार्गात बदल जाणून घ्या पर्यायी मार्ग-Tuljabhavani

Hot Posts

6/recent/ticker-posts

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या मार्गावर ४ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान वाहनांना प्रवेशबंदी; वाहतूक मार्गात बदल जाणून घ्या पर्यायी मार्ग-Tuljabhavani

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या मार्गावर ४ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान वाहनांना प्रवेशबंदी; वाहतूक मार्गात बदल जाणून घ्या पर्यायी मार्ग-Tuljabhavani 
प्रातिनिधीक फोटो 

तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे : कोजागिरी आणि मंदिर पौर्णिमा यानिमित्त तुळजापूरकडे  पायी चालत जाणाऱ्या भाविकांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे ६ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा व ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंदिर पोर्णिमा यादरम्यान वाहन चालकांसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षक व जिल्हाध्यक्ष  यांनी दिले आहेत.

सोलापूर  शहर, जिल्ह्यातील, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरकडे  पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहेत.  भाविकांचे सुरक्षिततेच्या कारणावरुन खालीलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करण्यात  आले आहेत. ४ ऑक्टोबर २०२५ रोजीपासून ७ ऑक्टोबर २०२५ रोजीचे २४ वा. दरम्यान खालील मार्गावरून पथक्रमण करण्यास अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात येत आहे.


ज्याअर्थी उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग तुळजापूर यांनी त्यांचे कडील पत्र जा. क्र. वाहतुक मार्ग बदल/5890/2025 दिनांक 19/09/2025 अन्वये सादर केलेल्या अहवालात सादर केले आहे की, श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक 22/09/2025 ते दिनांक 08/10/2025 पावेतो साजरा होत आहे.

दिनांक 06/10/2025 रोजी कोजागीरी पौर्णिमा व दिनांक 07/10/2025 रोजी मंदिर पौर्णिमा निमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातुन लाखोंच्या संख्येने भाविक पायी येत असतात. सदर नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापूर शहर व परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवु नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, याकरीता भाविक पायी चालत येणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे आमचे निदर्शनास आणून दिले आहे.

त्याअर्थी आम्ही किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.), जिल्हादंडाधिकारी, धाराशिव व रितु खोखर (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, धाराशिव आम्हास प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) अन्वये अधिकाराचा वापर करुन भाविकांचे सुरक्षीततेच्या कारणावरुन खालील प्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणे बाबत निर्देशित करीत आहोत.

             दिनांक 04/10/2025 रोजीचे 00:01 ते दिनांक 07/10/2025 रोजीचे 24:00 वा. दरम्यान खालील मार्गावरुन पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या वाहनास ( Light & Heavy Vehicles ) मनाई करण्यात येत आहे.

या मार्गावर वाहनास पूर्णपणे प्रवेश बंदी 

 1) छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबाद कडे जाणाऱ्या वाहतुकीला धाराशिव पासुन →तुळजापूर →व पुढे नळदुर्ग पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

2) हैद्राबाद ते छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या वाहतुकीला नळदुर्ग पासुन→ तुळजापूर →व पुढे धाराशिव पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

3) लातुर ते सोलापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीला औसा पासुन→ तुळजापूर →तामलवाडी →व पुढे सोलापूर पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

4) सोलापूर ते लातुर कडे येणाऱ्या वाहतुकीला सोलापूर पासुन→ तामलवाडी→ तुळजापूर→ व पुढे औसा पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

5)छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीला येरमाळा पासुन →धाराशिव→ तुळजापूर →तामलवाडी→ व पुढे सोलापूर पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

6) सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या वाहतुकीला सोलापूर पासुन →तामलवाडी→ तुळजापूर→ धाराशिव → व पुढे येरमाळा पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

7) तुळजापूर ते बार्शी कडे जाणाऱ्या वाहतुकीला तुळजापूर पासुन→ ढेकरी →गोडगाव →व पुढे बार्शी पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

8) बार्शी ते तुळजापूर कडे येणाऱ्या वाहतुकीला बार्शी पासुन→ गौडगाव→ ढेकरी →व पुढे तुळजापूर पर्यंत मनाई करण्यात येत आहे.

    ܀ सदरील मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील.
हा असणार पर्याय वाहतूक मार्ग

1. छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबाद कडे जाणारी वाहतुक छत्रपती संभाजीनगर→ बीड →मांजरसुंबा → अंबाजोगाई →लातूर→ औसा→ उमरगा मार्गे पुढे हैद्राबादकडे पथक्रमण करतील.
    किंवा छत्रपती संभाजीनगर →बीड →येडशी→ ढोकी →मुरुड→ लातूर →औसा→ उमरगा मार्गे पुढे हैद्राबादकडे पथक्रमण  करतील.
2. हैद्राबाद ते छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहतुक उमरगा→ औसा→ लातूर →अंबाजोगाई → मांजरसुंबा→ बीड मार्गे पुढे छत्रपती संभाजीनगर कडे पथक्रमण करतील. 
     किंवा उमरगा→ औसा→ लातूर→मुरुड→ ढोकी→येडशी→बीड मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे पथक्रमण करतील.
  अ.) धाराशिव ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील.
   ब.) सोलापूर ते धाराशिव कडे येणारी वाहतुक वैराग मार्गे पथक्रमण करतील.
3. लातुर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक मुरुड पासुन →ढोकी →येडशी→ बार्शी →पुढे सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील.
4.सोलापूर ते लातुरकडे येणारी वाहतुक सोलापूर पासुन बार्शी →येडशी→ ढोकी →मुरुड → पुढे लातुर या मार्गे पथक्रमण करतील.
5. छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक येरमाळा पासुन→ बार्शी →पुढे सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील.
6.सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहतुक सोलापूर पासुन→ बार्शी पुढे →येरमाळा या मार्गे पथक्रमण   करतील.
7.तुळजापूर ते बार्शी कडे जाणारी वाहतुक तुळजापूर → धाराशिव पुढे→ बार्शी या मार्गे पथक्रमण करतील.
8.बार्शी ते तुळजापूर कडे येणारी वाहतुक बार्शी→ वैराग →धाराशिव →पुढे तुळजापूर मार्गे पथक्रमण करतील.
9.तुळजापूर ते सोलापूर कडे जाणारी वाहतुक मंगरुळ पाटी पासुन→ इटकळ→ बोरामणी→ पुढे सोलापूर या मार्गे पथक्रमण करतील.
10.सोलापूर ते तुळजापूर कडे येणारी वाहतुक सोलापूर पासुन →बोरामणी→ इटकळ →मंगरुळ पाटी →पुढे तुळजापूर या मार्गे पथक्रमण करतील.
    वरील बंधने ही पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाच्या वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व एस. टी. बसेस या वाहनांना लागू राहणार नाहीत.
                         

Post a Comment

0 Comments