सोयाबीन काढण्याच्या कारणावरून महिलेस मारहाण, दोघी महिलाविरुद्ध गुन्हा दाखल -Tuljapur Crime News Daily
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : शेतातील सोयाबीन कमी जास्त काढण्याच्या कारणावरून एका महिलेस लाथा बुक्क्या व विळ्यानी मारहाण करून जखमी केल्याची घटना तुळजापूर येथील कृषी सेवा केंद्र येथे घडली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर शहरातील कृषी सेवा केंद्र येथे दिनांक 18 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपी विमल शिवाजी चाव्हाण, तेजश्री दिलीप चव्हाण दोघे राहणार( मोतीझरा लमाण तांडा तुळजापूर )यांनी दिनांक 18 रोजी सकाळी फिर्यादी बबीता दयानंद राठोड वय (30) (रा. मोतीझरा लमाण तांडा तुळजापूर) यांना सोयाबीन कमी जास्त काढणीच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी लोखंडी विळ्यांने मारहाण करत जखमी केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी बबीता राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments