खुनाच्या गुन्हात कारवाई न करण्यासाठी २ लाख लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह तीन पोलीस एसीबीच्या जाळ्यात, -ACB Trap Action Solapur Lohara Police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

खुनाच्या गुन्हात कारवाई न करण्यासाठी २ लाख लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह तीन पोलीस एसीबीच्या जाळ्यात, -ACB Trap Action Solapur Lohara Police Station

खुनाच्या गुन्हात कारवाई न करण्यासाठी २ लाख लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह तीन  पोलीस  एसीबीच्या जाळ्यात, -


धाराशिव/प्रतिनिधी रुपेश डोलारे :  खुनाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी 2 लाख लाच घेताना प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक करण्यात आले आहे लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी दिनांक 11 रोजी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे ,API,पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, लोहारा पोलीस ठाणे, आकाश मधुकर भोसले पोलीस शिपाई लोहारा पोलीस ठाणे,अर्जुन शिवाजी तिघाड़े पोलीस नाईक लोहारा पोलीस ठाणे,निवृत्ति बळीराम बोळके वर्ष,ASI, लोहारा पोलीस ठाणे, असे लाच स्वीकारणाऱ्या आरोपी पोलिसांचा समावेश आहे. 

या घटनेबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,तक्रारदाराने दि. 06/11/2025 रोजी अँटी करप्शन ब्युरो पुणे यांचेकड़े लेखी तक्रार दिली की, तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलिस स्टेशन जि.धाराशिव येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदारास सह आरोपी न करणेसाठी यातील वरील लोकसेवक यांनी 5 लाख रुपयाची लाच मागणी केली होती.त्यावेळी तक्रारदाराकडे 5 लाख नसल्याने तक्रारदाराने स्वतःकडील 10 तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले होते ते त्यानी ठेउन घेऊन तक्रारदाराला 5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी पोलीस ठाण्यातून पाठवून दिले.

तक्रारदार याने 5 लाख रुपयांची जुळणी करत असताना आरोपी लोकसेवकानी तक्रारदाराच्या भावाकडे जाऊन त्याच्याकडून परस्पर 4 लाख रुपये घेतले परंतु त्यानंतरही आरोपी लोकसेवक तक्रारदाराकडे आणखी 5 लाख रुपयाची लाच मागत असल्याची तक्रार केली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 6/11/2025, 07/11/2025, 10/11/2025 रोजी केलेल्या पडताळणी मध्ये पोलिस भोसले व पोलिस बोलके यांनी तक्रारदाराकडे यापुर्वी मागितलेले पैसे आनून देई पर्यंत तक्रारदाराचे 10  तोळ्याचे सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

 लोहारा पोलिस ठाणे प्रभारी API कुकलारे यांनी तक्रारदाराकडे पाच लाखाची प्राथमिक मागणी केल्यानंतर पडताळणी कारवाई मध्ये तक्रारदारांच्या भावाकडून 3 लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करून की तक्रारदाराकडून आणखी   2 लाख रुपयाची लाच मागणी करून सदर लाच रक्कम पोलिस भोसले किंवा पोलिस तिगाडे यांचेकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

 त्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने दि.11/11/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक अर्जुन शिवाजी तिघाड़े पोलीस नाईक 1595/लोहारा पोलीस ठाणे,यानी तक्रारदार यांचे शेतामधे,भातागली, ता.लोहारा,जि.धाराशिव येथे लोहारा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदास सह आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडून 2,00,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता 18:56 वाजता रंगेहात पकडण्यात आले आहे.सदरील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांना  ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाणे जि. धाराशिव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार कलम 7,7अ,12 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई पथकामध्ये सापळा अधिकारी,प्रशांत चौगुले, पोलीस उपाधीक्षक, प्रवीण निंबाळकर,पोलीस निरीक्षक,पर्यवेक्षक अधिकारी, दयानंद गावड़े,पोलिस उप अधीक्षक, यांचा समावेश होता.



  आरोपीचे अंगझडती /वाहन /कार्यालयाची झडती 

1)आलोसे अर्जुन शिवाजी तिघाडे याच्या अंगझडतीत लाच रक्कम 2 लाख रुपये तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन 

2) आलोसे ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे याच्या अंगझडतीत मोटोरोला कंपनीचा फ़ोन,रोख रक्कम 2,438/-रुपये,

3) आलोसे आकाश मधुकर भोसले याच्या अंगझडतीत सॅमसंग कंपनीचा फ़ोन,रोख रक्कम 2,300/-रुपये,

 4) आलोसे निवृत्ति बळीराम बोळके याच्या अंगझडतीत मोटोरोला कंपनीचा फ़ोन, रोख रक्कम 600/-रुपये,

अशा वस्तू मिळून आल्या.


8.मोबाईल जप्ती:-  

आलोसे यांचे मोबाइल तापासकामी जप्त करण्यात आले आहेत.


9.आरोपीची घर झडती:-

आरोपीच्या घरझडतीसाठी पथक तात्काळ रवाना करण्यात आले आहे.घरझडतीची प्रक्रिया सुरु आहे...



Post a Comment

0 Comments