इटकळ ग्लोबल व्हिलेजच्या गौरी पाटील ची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड-
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय तलवारबाजी (Fencing) स्पर्धेत कै . ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित, ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल (सी बी एस ई), बोरामणी येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. गौरी विश्वपुत्र पाटील हिने फेंसिंग या खेळ प्रकारातील अंडर-17 गटात उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला असून, तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहेत.कु. गौरीला क्रीडा शिक्षक श्री. रमेश दोडमनी व विनायक गोविंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व सचिवा सौ. संगिता शहा, उपाध्यक्ष प्रा. अनिकेत चनशेट्टी,प्राचार्या आसमा नदाफ, अधीक्षक मल्लिनाथ जळकोटे यांनी कु. गौरी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Comments