धाराशिव:अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी शिक्षा धाराशिव विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेऊन तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षे सक्त मजुरी शिक्षा व 41 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना ऑगस्ट 2023 मध्ये धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे (Dharashiv city police station)हद्दीत घडली होती.
याबाबत जिल्हा सरकारी वकीलांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तक्रदर यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन त्यांची पीडित मुलगी ही शाळेत येत-जात असताना तिला आरोपी ओंकार तानाजी काळे यांनी सतत पाठलाग करून तसेच ठार मारण्याची धमकी देत त्रास दिला याबाबत फिर्यादी आरोपीच्या वडिलांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी आरोपी मुलास समज दिली तरीही ओंकारच्या वागण्यात बदल झाला नाही त्यानंतर फिर्यादीने मुलीस सोलापूर येथे शिक्षणासाठी ठेवले. दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी पिडीत मुलगी कॉलेजला गेली असता आरोपी ओंकार तानाजी काळे यांनी पिडीतेस फूस लावून पळून नेले व तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. तिला आयुष्य बरबाद करेन असे धमकाबत तिला पनवेल, मुंबई येथे घेऊन गेला तेथे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांनी पिडीतेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी विरूध्द पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एस गोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet)सादर केले .सदर खटल्याचे सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश धाराशिव श्री. आवटे यांच्या समोर झाली सरकार पक्षाच्या वतीने एकूण 11 साक्षीदाराच्या साक्ष नोंदविण्यात आल्या सरकार पक्षाचा पुरावा व शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी ओमकार तानाजी काळे यास दोषी ठरवत 20 वर्षे सक्त मजूरची शिक्षा व 41 हजार 500 रुपयांचा दंड अशी शिक्षा सोमवारी दि, 24 रोजी ठोठावली आहे. यामध्ये कोर्ट पैरवी म्हणून प्रांजली साठे यांनी काम पाहिले.
पोलिसांनी दिली होती बाप -लेकांस समज
आरोपीच्या वडिलांनी फिर्यादीस भेटून पीडित मुलीचे लग्न लावून देण्याचा सल्ला दिला यामुळे फिर्यादीने शहर पोलीस ठाणे येथे जाऊन याप्रकरणी आरोपी व त्याच्या वडिलांना समजावून सांगण्याबाबत पोलीस अधिकारी श्री.गोरे यांना विनंती केली त्यानुसार श्री.गोरे यांनी आरोपीवर त्याच्या वडिलांना बोलवून घेत याप्रकरणी समज दिली यावेळी आरोपीच्या वडिलांनाही ओंकार यापुढे पुढे त्रास देणार नाही अशी खात्री दिली.

0 Comments