कर्तव्यातील गैरवर्तुनीकीबद्दल तामलवाडी पोलीस ठाणे येथील पोलीस अंमलदार अल्ताफ गोलंदाज यांचे निलबंन; पोलिस अधीक्षक यांनी दिले अंमलदाराच्या निलंबनाचे आदेश-
धाराशिव: कर्तव्यावर असताना नागरिकाकडून दोनशे रुपयाची नोट घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कर्तव्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी तामलवाडी पोलीस स्टेशनच्या एका पोलिस अंमलदाराचे निलंबन पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आज दिनांक 26 रोजी करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक रितू भोकर यांनी ही कारवाई केली. अल्ताफ मकबूल गोलंदाज असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मा. पोलीस अधीक्षक श्री. रितु खोखर यांचे आदेशाने पोलीस ठाणे तामलवाडी येथील पोलीस अंमलदार/1413 अलताफ मकबुल गोलंदाज यांनी दि. 19.11.2025 कर्तव्यावर असताना नागरिकाकडून 200 रुपयाची नोट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांचे कर्तव्यातील उक्त गैरवर्तणुकीबद्दल त्यांना आज दि. 26.11.2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस विभागात जबाबदारी आणि शिस्त यांना प्राधान्य दिले जाईल, तसेच अशा निष्काळजीपणास कोणतीही सहनशीलता दाखविण्यात येणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

0 Comments