पुरंदावडे सदाशिवनगर येथे रेणुका माता यात्रेस १ डिसेंबर पासून प्रारंभ, यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन-Sadashivnahar Renukamata devi Yatra

Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदावडे सदाशिवनगर येथे रेणुका माता यात्रेस १ डिसेंबर पासून प्रारंभ, यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन-Sadashivnahar Renukamata devi Yatra

पुरंदावडे सदाशिवनगर येथे रेणुका माता यात्रेस १ डिसेंबर पासून प्रारंभ, यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन-


अकलूज / प्रतिनिधी संजय निंबाळकर : पुरंदावडे (सदाशिवनगर) येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री रेणुका माता यात्रेचे आयोजन 1 ते 3 डिसेंबर असे तीन दिवस करण्यात आले आहे.

यामध्ये सोमवारी 1 डिसेंबर रोजी श्री रेणुका मातेला साडीचोळी करून यात्रेस प्रारंभ होणार आहे त्याच दिवशी दुपारी 4 ते 5 वा.. व रात्री 7 ते 10 वा नाळेमळा येथे माहेरी कार्यक्रम संपन्न होणार आहे. मंगळवारी 2 डिसेंबर गंध लिंब, दुपारचा महानैवद्य  व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवारी 3 डिसेंबर रोजी गावातून सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत  छबीना व 4 वाजता होमाचा ( किच ) कार्यक्रम होणार आहे तरी पुरंदावडे व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेणुकामाता देवीचे पुजारी जगूबाई बाजीराव मोहिते शिवाजी बाजीराव मोहिते दादासाहेब शिवाजी मोहिते आप्पासाहेब शिवाजी मोहिते आदित्य दादासाहेब मोहिते व समस्त ग्रामस्थ पुरंदावडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments