माढा तालुक्यातील कन्हेरगाव दहिवली परिसरात बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वन विभाग कडून सतर्क राहण्याचे आवाहन -Solapur -Madha-Taluka Bibtya

Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तालुक्यातील कन्हेरगाव दहिवली परिसरात बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वन विभाग कडून सतर्क राहण्याचे आवाहन -Solapur -Madha-Taluka Bibtya

माढा तालुक्यातील कन्हेरगाव दहिवली परिसरात बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वन विभाग कडून सतर्क राहण्याचे आवाहन -Solapur -Madha-Taluka Bibtya 

प्रतिकात्मक फोटो

माढा : माढा तालुक्यातील कन्हेरगाव व दहिवली परिसरात गेल्या दोन दिवसापासून बिबट्याचा वावर दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी आणि गुरुवारी सायंकाळी सात ते दहा च्या दरम्यान कन्हेरगाव येथील पाटील वस्तीवर व दहिवली येथील दिवटे वस्तीवर बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला आहे या परिसरात पुन्हा बिबट्याने एन्ट्री केलेली नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कनेरगाव येथील पाटील वस्ती येथे बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजता बिबट्या दिसला असून नवनाथ ताटे व विशाल पाटील हे दोघेजण शेतातून मोटरसायकलवरून आपल्या घराकडे जात असताना हनुमान ताटे यांच्या केळीच्या बागेतून अचानकपणे बिबट्याने नवनाथ पाटील यांच्या गाडीच्या दिशेने झेप घेतली त्यानंतर ताटे यांच्या गाडीचा सायलेन्सवर बिबट्याचा पंजा पडला होता यावरून या बिबट्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे कनेरगाव येथील पाटील वस्ती, हांडे वस्ती, डोके वस्ती, शिंदे वस्ती, काशीद वस्ती ,भरघंडे वस्ती येथे राहणारे सर्व ग्रामस्थ भयभीत  झाले आहेत. गुरुवार दिनांक 6 रोजी रात्री 11 वाजता दरम्यान दहिवली तालुका माढा येथील दिवटे वस्ती येथील अरुण तुकाराम देवकर यांच्या गाईच्या वासरा हल्ला केला आहे. कन्हेरगाव व दहिवली परिसरात सलग दोन दिवस बिबट्याचा वावर असल्याने त्या भागातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे. कनेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी वन विभागाच्या वनपाल बाबासाहेब लटके, शुभम धायतडक तसेच कर्मचारी विकास डोके यांना फोन करून घटनेची माहिती सांगितली तसेच बिबट्याला जेरबंद  करण्याची मागणी केली आहे.

काळजी घेण्याची वन विभागाचे आवाहन 

कन्हेरगाव परिसरात पुन्हा बिबट्याही दहशत माजवली आहे सर्वांनी काळजी घ्यावी बाहेर कोणीही एकट्याने फिरू नये झोपूनही आपल्या भागात बिबट्याचा वावर वाढला हे नागरिकांनी काळजी घ्यावी अशी आव्हान वन विभागाचे वनपाल बाबासाहेब लटके यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments