चिवरी येथे तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिर संपन्न-
चिवरी /प्रतिनिधी बिभिषन मिटकरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे दिनांक 4 रोजी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा चरित्र च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न झाले यामध्ये 350 नागरिकांनी तपासणी केली;यामध्ये 50 रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी सोय करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना मोफत आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आले यावेळी नेरूळ मुंबई येथील डॉक्टर मंडळीचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे सरपंच पिंटू बिराजदार उपसरपंच लक्ष्मण लबडे, माजी सैनिक धनराज झांबरे गोरोबा कोरे आशा कार्यकर्त्या राजश्री कांबळे ,अर्चना राजमाने आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.






0 Comments