मौजे इटकळ येथील ग्रामपंचायत कर वसुलीत ५०% सवलत-
--------------------------------------------
मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियान मोहीम अंतर्गत उपक्रम.
------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत कर भरण्यास ५०% सवलत देण्यात येत असून गावातील सर्व ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच साहेबा क्षीरसागर व ग्रामपंचायत अधिकारी नितीन कांबळे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.ग्रामपंचायतीं मधील थकीत करवसुली वाढवण्यासाठी आणि गावांच्या विकासाला नवा वेग देण्यासाठी हा शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. निवासी मालमत्ता धारकांना आता घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करांवर थेट ५०% सवलत मिळणार आहे.एकरकमी कर भरणे अनिवार्य करदात्याने खालील रक्कम एकदाच भरावी लागेल, जसे की सन २०२५-२६ चा पूर्ण कर १ एप्रिल २०२५ पूर्वीची थकबाकीची ५०% रक्कम थकबाकी १०००० + चालू कर २०००
भरायचे = ५००० (थकबाकीचे ५०%) + २००० एकूण ७०००रुपये भरल्यानंतर संपूर्ण १०००० ची थकबाकी माफ करण्यात येणार आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी लवकरात लवकर कर भरणा करून ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा त्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ ही आहे.

0 Comments