जामखेड :नृत्यांगणीची लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्या प्रकरणी माजी नगरसेवक संदीप गायकवाड वर गुन्हा दाखल-
अहिल्यानगर : नर्तिका पूजा गायकवाडच्या त्रासाला कंटाळून बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच त्या पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरांमधील तपनेश्वर भागातील नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील वय(35) रा.मूळ (कल्याण मुंबई) यांनी गुरुवारी दिनांक ५ रोजी सकाळी खर्डा रोडवरील लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका माझी नगरसेवकावर वर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की जामखेड शहरातील तपेश्वर भागातील नृत्यांगना दिपाली पाटील ही नृत्यांगना म्हणून कार्यरत होती व आपल्या काही मैत्रिणीसह या भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून दिपाली घराबाहेर पडली मात्र दुपारनंतरही ती परत न आल्याने व तिचा फोन देखील बंद असल्याने मैत्रिणीने शोधाशोध केली असता; दिपालीला सोडणाऱ्या रिक्षा चालकांनी तिला खर्डा रोडवरील साई लॉज मध्ये सोडल्याचे सांगितले. संध्याकाळी साडेपाच वाजता मैत्रिणी लॉज मध्ये पोहोचले असता रूम आतून लॉक होती विटांच्या मतीने डुप्लिकेटच्या चावीने दरवाजा उघडला असता दिपाली पण केला गळफास घेऊन घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली या घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्याचे नेमके कारण झाले नव्हते मैत्रीण हर्षदा रवींद्र कामटे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणाची नोंद घेतली आहे, दरम्यान याबाबत मयत दिपाली गोकुळ पाटील हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड यांच्यावर आत्महत्या प्रवर्त केल्याचा जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नृत्यांगना आत्महत्या प्रकरणी माजी नगरसेवक गायकवाड यास 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी
जामखेड शहरातील नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी माजी नगरसेवक संदीप गायकवाड यास 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची आदेश न्यायालयाने दिले आहे .जामखेड येथील तपनेश्वर गल्ली येथे नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील राहत होती तिने जामखेड खर्डा रोडवरील असलेल्या साई लॉजवर आत्महत्या केली होती याप्रकरणी दिपालीच्या आईने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा माझ्या मुलीची वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ करून माझ्याबरोबर लग्न कर म्हणून तगादा करत होता त्याच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्यादी दिली आहे.
त्यावरून गायकवाड यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे यांनी संदीप सुरेश गायकवाड यास अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 9 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

0 Comments