अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम तरुणास १० वर्षे सश्रम कारावासाची व दंडाची शिक्षा ; बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल -Minor Girl Assult Judgement Barshi

Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम तरुणास १० वर्षे सश्रम कारावासाची व दंडाची शिक्षा ; बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल -Minor Girl Assult Judgement Barshi

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम तरुणास १० वर्षे सश्रम कारावासाची व दंडाची शिक्षा ; बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल -


सोलापुर : करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने जबरदस्तीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता तसेच लग्नाचे आमिष दाखवून फिरायला नेऊन आरोपीच्या बहिणीने पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली होती याप्रकरणी पीडीतीने करमाळा पोलीस ठाण्यामध्ये संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात सबळ पुराव्याच्या आधारे आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावासाची  शिक्षा ठोठावली आहे ही शिक्षा बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिनांक २० जानेवारी रोजी सुनावली आहे. 

आरोपी शिवम भारत मगर वय २७ वर्षे याने दि. २८/०४/२०२४ रोजी निर्भया मुलगी राहत असलेल्या घरी अल्पवयीन निर्भया ही एकटी असताना घरात येवून तिचे हाताला धरून तिला दिवाणावर पाडून मिठीत घेवून चुंबन घेवू लागला. त्यावेळी पिडीता नकार देत असताना आरोपीने जबरदस्तीने पिडीतेवर शारीरीक अत्याचार केला, त्यानंतर दि २९/०४/२०२४ रोजी तिला लग्नाचे अमिष दाखवून फिरायला म्हणून उरळी कांचन पुणे येथे आरोपीचे बहीणीचे घरी नेले. तिथे बहीणीने निर्भया हीस तु आमच्या बाजूने जबाब नाही दिला तर तुला जिवे मारीन अशी धमकी दिली याप्रकरणी आरोपीविरुध्द करमाळा पोलीस ठाणेस गु.र.नं २८२/२०२४ भा.द.वि. कलम ३६३,३७६(१),५०६ व बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ४,१७ अन्वये दि. ३०/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी आरोपीस अटक करून सबळ पुरावा गोळा करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी महत्वाचे ८ साक्षीदार तपासण्यात आले. यातील निर्भया हिने आरोपीविरूध्द दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली आहे. निर्भया हिचे साक्षीस अनुसरुन वैद्यकीय अधिकारी डॉ स्मिता बंडगर यांनी निर्भया हिची वैदयकिय तपासणी केली. सदर वैदयकिय अधिकारी यांनी दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण होती. सदर प्रकरणात तपासिक अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांनी सदर गुन्हाचा तपास करताना अतिशय महत्त्वपूर्ण तपास करून आरोपीविरूध्द सबळ पुरावा गोळा केला होता.

निर्भया हिचे बरोबर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने मे. कोर्टासमोर आलेला पुरावा या सर्व बाबी मे. कोर्टासमोर सहा सरकारी वकिल श्री. दिनेश देशमुख यांनी मा. सर्वाच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय मे. कोर्टासमोर मांडल्या व संपूर्णबाब रेकॉर्डवर आणली. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार नितीन ताकभाते यांनी साक्षीदारांना योग्य मार्गदर्शन करून वेळोवेळी कोर्टात हजर ठेवले.

सरकार पक्षाचे वतीने करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय धरुन, आरोपीने अल्पवयीन निर्भया हिचेवर बलात्कार केला आहे. ही बाब निदर्शनास आणुन देण्यात आली.सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता मा. विशेष जिल्हा न्यायाधीश श्री. विक्रमादित्य मांडे साहेब यांनी आरोपी शिवम भारत मगर वय २७ वर्षे रा नेर्ले. ता करमाळा जि. सोलापूर यास भादविक ३७६ (ए) अन्वये दोषी धरुन १० वर्षे सश्रम कारावास व ५०००/- हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कारावास, भादविक ३६३ अन्वये दोषी धरुन ७ वर्षे सश्रम कारावास व २०००/- हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिने कारावास, बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ४ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व ५०००/- हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कारावास ठोठावण्यात आला.

सरकार पक्षा तर्फे अॅड. श्री. दिनेश देशमुख यांनी काम पाहीले. सदर गुन्हयाचा तपास सपोनि श्री. रोहित शिंदे यांनी काम केलेला होता. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ/१२९० नितीन ताकभाते यांनी काम पाहिले.सदर केसमध्ये मा श्रीमती अंजना कृष्णा व्ही एस साो, सहायक पोलीस अधिक्षक करमाळा उपविभाग करमाळा व पोलीस निरीक्षक श्री रणजित माने करमाळा पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

Post a Comment

0 Comments