दुर्दैवी घटना : परभणी-जिंतूर मार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; ३ वारकरी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू-Parbhani-jintur Road Accident threee maharaj Died

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : परभणी-जिंतूर मार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; ३ वारकरी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू-Parbhani-jintur Road Accident threee maharaj Died

दुर्दैवी घटना : परभणी-जिंतूर महामार्गावर कार व दुचाकीचा भीषण  अपघात; ३ वारकरी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू-


परभणी: जिल्ह्यातील परभणी -जिंतुर मार्गावर काल (शुक्रवारी) दि,९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या कार व मोटरसायकलच्या भीषण रस्ते अपघातात मोटरसायकल वरून कीर्तनाहून परतणाऱ्या ३ वारकरी महाराजांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परभणी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. माऊली महाराज कदम, ह.भ.प. प्रसाद महाराज कदम आणि ह.भ.प. दत्ता महाराज कऱ्हाळे हे तिघे परभणी तालुक्यातील पिंपळा येथे कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कीर्तन सेवा आटोपून ते रात्री उशिरा दुचाकीवरून आपल्या गावी (बोर्डीकडे) परतत होते.

परभणी-जिंतूर महामार्गावर झरी (Zari) गावाजवळील लोअर दुधना डाव्या कालव्याच्या परिसरात त्यांच्या दुचाकीला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेत जिंतूर तालुक्यातील बोर्डी आणि मुडा येथील तीन वारकऱ्यांचे निधन झाले आहे .ह.भ.प. माऊली दिगंबरराव कदम (वय ३० वर्षे, रा. बोर्डी, ता. जिंतूर) ह.भ.प. प्रसादराव कदम (वय ४५ वर्षे, रा. बोर्डी, ता. जिंतूर) ह.भ.प. दत्ता माणिकराव कऱ्हाळे (वय ३० वर्षे, रा. मुडा, ता. जिंतूर) असे मयत वारकरी महाराजांची नावे आहेत. 

या घटनेमुळे जिल्ह्यासह वारकरी संप्रदायामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे मृतांपैकी दोघेजण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मूळ गावातील वारकरी होते.या अपघाताची बातमी समजताच नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.आई-वडिलांसह कुटुंबीयांचा आक्रोश पाहून वातावरण हळहळजनक झालं होतं.कीर्तनासाठी गेलेल्या वारकऱ्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परभणी जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.दरम्यान या अपघातप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.


वारकरी संप्रदायात हळहळ:

हे तिन्ही महाराज वारकरी संप्रदायात सक्रिय होते आणि गावोगावी जाऊन कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे बोर्डी आणि मुडा गावांसह संपूर्ण परिसरात दु:खाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments