अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात नराधम पित्याला ७ वर्षाचा सश्रम कारावास बीड विशेष सत्र न्यायालयाचा निकाल-
बीड/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : स्वतःच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधम बापास बीडच्या विशेष न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे .हा निकाल बीड येथील विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस घोरपडे यांनी दिला शिरूर कासार पोलिसांनी या अत्यंत संवेदनशील प्रकरणात केलेल्या शास्त्रोक्त केलेला तपास या निकालासाठी महत्त्वाचा ठरला असून पीडीतेला अखेर न्याय मिळाला.
16 ऑगस्ट 2024 रोजी शिरूर कासार परिसरात ही घटना उघडकीस आली होती स्वतःच्या पित्यानेच मुलीला वारंवार मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते या संकटातून मार्ग काढत पिडीतीने अत्यंत धैर्याने 18 ऑगस्ट 2024 रोजी शिरूर कासार पोलीस ठाणे गाठले यांनी आपल्या नराधम पित्याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीची गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 74, 75 ,76 ,115 तसेच 2012 च्या कलम 10 12 अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.
सदरील प्रकरणाचा तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केला पीडीतेचा जवाब प्रत्यक्षदर्शीच्या साक्षी आणि तांत्रिक पुरावे गोळा करून वेळेत दोषारोपत्र न्यायालयास सादर केले. हा खटला बीड येथील विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस एस घोरपडे यांच्यासमोर चालला सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोग्यता ए.बी तिडके यांनी जोरदार युक्तिवाद केला सादर केलेले पुरावे यांनी साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले तसेच आरोपीला आर्थिक दंड ठोठावण्यात आला असून पिडीतेला नुकसान भरपाई देण्याची आदेश ही न्यायालयाने दिली आहे.
तपास पथकाची कौतुक
हा संवेदनशील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक गोविंद सानप यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ए.बी तिडके यांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला.

0 Comments