सुनाचे नावावर जमीन करण्याच्या कारणावरून कुटुंबास बेदम मारहाण नऊ जणांवर गुन्हा दाखल उमरगा तालुक्यातील घटना -
धाराशिव : सुनेच्या नावावर दहा एकर जमीन करण्याच्या कारणावरून एका कुटुंबास बेदम मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यातील डाळिंब येथे घडली, ही घटना दिनांक 7 रोजी घडली याप्रकरणी फिर्यादी इंद्रजीत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जनाविरुद्ध मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-सिध्दी अभिजीत पाटील, रेणुका संदीप पाटील, सचिन संदीप पाटील, नारायण रामकिसनल पाटील, विशाल इंद्रजीत पाटील, गुंडाजी शिरुरे, रा. साकोळा जवळगा ता. देवणी जि. लातुर, मनोज प्रभाकर कुलकर्णी, पुरुषोत्तम प्रभाकर कुलकर्णी, उज्वला पुरुषोत्तम कुलकर्णी, रा. कलदेव लिंबाळा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.07.01.2026 रोजी 19.30 ते 20.30 वा. सु. दाळींब येथे फिर्यादी नामे-इंद्रजीत रामराव पाटील, वय 50 वर्षे, रा.दाळींब ता. उमरगा जि.धाराशिव यांना व त्यांचा मुलला, पत्नी व वडील यांना नमुद आरोपींनी फिर्यादी यांचे सुनाचे नावे दहा एकर जमीन करण्याच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-इंद्रजीत पाटील यांनी दि.09.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे मुरुम येथे भा.न्या.सं.कलम 191(2), 115(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास मुरूम पोलीस करत आहेत.

0 Comments