दुर्दैवी घटना : देवदर्शनवरून जाताना भावी नववधू-वरावर काळाचा झाला; मैलापुर येथून देवदर्शन करून परतताना टॅंकरने - दुचाकीला उडवले ;दोघांचा जागीच मृत्यू-
धाराशिव :लोहारा तालुक्यातील दस्तापुर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 व दस्तापुर गावाजवळ टँकरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघातात नियोजित वधू-वरांचा जागीच मृत्यू झाला .ही घटना रविवार दिनांक 4 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या तीन महिन्यानंतर लग्न येऊन ठेपले असताना नीयतीच्या मनात वेगळे सुरू होते सुखी संसारासाठी नळदुर्ग मैलारपूर येथील खंडोबाची यात्रा करून घराकडे परतत असताना टॅंकरने दुचाकी ला चिरडले .या भीषण अपघातात दोघांचाही जागेच मृत्यू झाला ही दुर्घटना सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दस्तापुर तालुका लोहारा येथे रविवार दिनांक 4 रोजी दुपारी 2 वाजता घडली.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लोहारा तालुक्यातील जेवळी पूर्व तांडा येथील बबन गोपाळ पवार वय (26) व रोहिणी बाबू राठोड वय (21) या दोघांचा वर्षभरापूर्वी साखरपुडा झाला होता .एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह सोहळा संपन्न होणार होता बबन मुंबईत नोकरी करत होता . दोन दिवसांपूर्वी गावी आला होता . नळदुर्ग येथे खंडोबा यात्र असल्याने बबन होणारी पत्नी रोहिणी हिच्या समवेत दुचाकीनी शनिवार दिनांक 3 रोजी यात्रेसाठी गेले होते. देवदर्शन केल्यानंतर रात्री मुक्काम करून रविवार दिनांक 4 रोजी दुपारी जेवळी पूर्व तांडा गावाकडे निघाले होते ;दरम्यान ते जळकोट दरम्यान नवीन सीएनजी पंप समोर सोलापूर कडे जाणाऱ्या टँकरने MH-AQ- 42 67 96 या दुचाकीस चोराची धडक दिली. या भीषण अपघातात बबन पवार ,रोहिणी राठोड यांच्या डोक्याची गंभीर मार लागून त्यांचा जागेस मृत्यू झाला .
या अपघातानंतर चालकांनी टँकरचा पलायन केले ग्रामस्थांनी पाठलाग केला असता टॅंकरचालकांनी टँकर जळकोट येथे थांबून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांनी त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मयत युवकाच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ ,दोन बहिणी तर मुलीच्या पक्षात आई-वडील दोन भाऊ ,बहीण आजी असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments