नात्याला काळीमा फासणारी घटना : सावत्र मुलाकडून आईवर अत्याचार; दोघां जणाविरुद्ध गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Crime News Today

Hot Posts

6/recent/ticker-posts

नात्याला काळीमा फासणारी घटना : सावत्र मुलाकडून आईवर अत्याचार; दोघां जणाविरुद्ध गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Crime News Today

नात्याला काळीमा फासणारी घटना : सावत्र मुलाकडून आईवर  अत्याचार; दोघां जणाविरुद्ध गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Latest Crime News 

धाराशिव  (प्रतिनिधी) – कळंब पोलीस ठाणे हद्दीत एका 26 वर्षीय महिलेवर तिच्या सावत्र मुलासह अन्य एका तरुणाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) ही दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी असताना तिच्या सावत्र मुलाने तिला कायमचे माहेरी हाकलून देण्यासाठी तसेच स्वतःच्या आईला पुन्हा घरी आणण्याच्या हेतूने तिच्यावर जबरदस्ती केली. या वेळी त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका तरुणाने पीडितेचे पाय धरून तिला विरोध करण्यास असमर्थ केले.

तक्रारीनुसार, दोघांनीही पीडित महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी कळंब पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली.

त्यानुसार पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 64, 114, 116, 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा अधिक  तपास पोलीस अधिकारी करीत असून संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments