संतापजनक घटना : पोलीस भरतीपूर्व ट्रेनिंगच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार-Ahilyanaga Crime News Youngs Girl Assult

Hot Posts

6/recent/ticker-posts

संतापजनक घटना : पोलीस भरतीपूर्व ट्रेनिंगच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार-Ahilyanaga Crime News Youngs Girl Assult

संतापजनक घटना : पोलीस भरतीपूर्व ट्रेनिंगच्या बहाण्याने  तरुणीवर लैंगिक अत्याचार- 


अहिल्यानगर : पुणे जिल्ह्यातील एक युवती पोलीस दलात आपले करिअर घडवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका अकॅडमी मध्ये भरती झाल्यावर अकॅडमी चालकांनी तिच्याशी जवळीक साधून वारंवार लैंगिक अत्याचार करत जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पुणे जिल्ह्यातील एक युवती उच्च शिक्षण घेण्यासाठी श्रीगोंदा या ठिकाणी आली होती तसेच तिला पोलीस भरतीमध्ये करिअर घडवायचे असल्यामुळे तिने शिक्षणाबरोबर श्रीगोंद्यातील एक अकॅडमी जॉईन केली मात्र डिसेंबर 2024 मध्ये पोलीस भरती ग्राउंड ची तयारी करत असताना तिचा अचानक पाय लचकला याबाबत तिने अकॅडमी (Acadamy) चालकास विचारणा केली असता त्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर ग्राउंड वर बोलवून घेतले व पायाला ट्रेनिंग करण्याच्या बहाण्याने  पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व फिर्यादीची जवळीक साधून तिच्या इच्छिविरूद्ध संबंध ठेवले.

याबाबत कोणालाही काही  सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर त्यांनी वेळोवेळी पिडीतिच्या इच्छेविरूद्ध ग्राउंडवर व त्याच्या राहत्या घरी नेऊन अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले त्यातून जानेवारी 2025 मध्ये फिर्यादीच्या पोटात अचानक दुखू लागल्यानंतर ती उपचारा कामी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात गेली असता ती गर्भवती असल्याचे तिला समजले .तिने आरोपीस आपण गर्भवती असल्याचे सांगितले त्यावेळी संबंधित अकॅडमी चालक व त्याचा मित्र हे तिच्या रूमवर गर्भपाताच्या गोळ्या घेऊन गेली व जबरदस्तीने त्या दिल्या त्याने गर्भपात झाला त्यावेळेस पिढी तिने त्यास लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी साफ नकार दिला .त्यानंतर ऑक्टोबर 2025 पर्यंत जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला .त्यानंतर त्यांच्या होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून पिडीतेने अखेर श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून संबंधित अकॅडमी चालक व त्याचा मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास श्रीगोंदा(Shrigonda Police Station)  पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments