Breaking- आफुच्या झाडाची लागवड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; 8.81 लाखांचा मुद्देमाल जप्त-
धाराशिव – वाशी तालुक्यातील पकरुड शिवारातील एका शेतात बेकायदेशीररित्या आफु (अफू)च्या झाडांची लागवड केल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 58 किलो 745 ग्रॅम वजनाचा अफू जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 8,81,175 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुप्त माहितीवरून कारवाई
दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री. शिंदे यांना गुप्त बातमीदाऱ्यामार्फत पकरुड शिवारातील शेतात आफुची लागवड केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
शेतात चौकशी केली असता अशोक नरहरी चव्हाण (वय 60 वर्षे), राजेंद्र आत्माराम चव्हाण (वय 60 वर्षे) व धोंडीराम कोडींबा चव्हाण (वय 50 वर्षे), तिघे रा. पकरुड ता. भूम जि. धाराशिव यांनी आफुची लागवड केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचनामा करून मुद्देमाल जप्त
सदर शेतातून मिळालेला 58 किलो 745 ग्रॅम वजनाचा अफू पंचनामा करून जप्त करण्यात आला. त्यानंतर तिघांविरुद्ध Narcotic Drugs and Psychotropic Substances Act अंतर्गत कलम 8(ब) व 18 प्रमाणे गुन्हा क्रमांक 72/2026 नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, घोडके, पोउपनि भाळे, पोलीस हवालदार बोरकर, लाटे, चौघुले तसेच पोलीस अमलदार मंलगनेर, मिसाळ, खैरे, कोरदे आदींचा सहभाग होता.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कुठेही बेकायदेशीर अंमली पदार्थांची लागवड किंवा व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

0 Comments