शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Rain News Today

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Rain News Today

शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Rain News Today


लातुर-प्रतिनिधी दि,२३:

उदगीर तालुक्यातील वायगाव येथे आज सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दिगंबर राम बेळकुंदे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

अचानक बदललेले वातावरण ठरले जीवघेणे

मिळालेल्या माहितीनुसार, वायगाव येथील शेतकरी दिगंबर बेळकुंदे हे आपल्या शेतात गव्हाचे पीक गोळा करत होते. दुपारनंतर उदगीर व परिसरात वातावरणात अचानक बदल झाला. सुमारे चार वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या.

सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आणि विजांच्या कडकडाटात अचानक वीज थेट बेळकुंदे यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला .

उपचारापूर्वीच मृत्यू

घटनेनंतर शेजारील शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेत बेळकुंदे यांना उदगीर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

गावात शोककळा

या आकस्मिक घटनेमुळे बेळकुंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वायगाव परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली आहे. प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत असून पुढील कार्यवाही सुरू आहे.


(सावधगिरीचा इशारा)
हवामान खात्याच्या इशाऱ्यांनुसार वादळी वाऱ्यासह पाऊस व विजांचा कडकडाट होत असल्यास शेतकरी व नागरिकांनी उघड्या जागेत थांबू नये, झाडाखाली आसरा घेऊ नये आणि शक्यतो सुरक्षित स्थळी थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments