परंडा : लॉजवर नेऊन 24 वर्षीय महिलेवर लैंगिक अ अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल -Dharashiv Crime News Update 
धाराशिव – परंडा तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय महिलेवर लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच गावातील एका तरुणाने तिला लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पीडिता मानसिक धक्क्यात असून तिने 28 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(म), 333, 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तवार हे करत आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा आणि कायदेशीर मदत घ्यावी.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
0 Comments