धाराशिव : केंद्र शासन आपल्या दारी” सेमिनारमध्ये सराफ सुवर्णकारांना परिचयपत्र वाटप; व्यवसाय कायदेशीर व आधुनिक पद्धतीने करण्याचे मार्गदर्शन
धाराशिव : सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आणि धाराशिव जिल्हा सराफ असोसिएशन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “केंद्र शासन आपल्या दारी” या विषयावर धाराशिव येथे सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लोकप्रिय आमदार कैलास दादा घाडगे पाटील यांच्या हस्ते सराफ सुवर्णकार बांधवांना परिचयपत्रांचे वाटप करण्यात आले.
या सेमिनारमध्ये सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून सराफ सुवर्णकार व संलग्न व्यवसायिक बांधवांना व्यवसाय कायदेशीर व संविधानिक मार्गाने कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कलम 411 (BNS) व कलम 317 अंतर्गत होणाऱ्या कारवाईला कायदेशीर पद्धतीने कसे सामोरे जावे, याचीही सविस्तर माहिती देण्यात आली. समितीच्या या उपक्रमाचे आमदार घाडगे पाटील यांनी कौतुक करत सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आपला पाठिंबा व्यक्त केला.
या वेळी समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुऱ्हाडे यांच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले. तसेच धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा तुळजापूर नगरपालिकेचे नगरसेवक मधुकरजी शेळके, गणेशशेठ बनछोड, राज्य सचिव व राज्य सह-संपर्कप्रमुख सचिनशेठ बानकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिलीपशेठ सिदवाडकर, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय स्वामी, मोहोळ तालुकाध्यक्ष आमोल हीलाले, मोहोळचे प्रसिद्ध सराफ तसेच मुरुड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी दीक्षित, सुनीलजी वेदपाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धाराशिव असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष कपिलजी शर्मा, शहराध्यक्ष रामदासजी वंजारी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेमिनारमध्ये अर्चना भोसले मॅडम आणि अर्चना पांडे मॅडम यांनी शासनाच्या विविध योजना, विमा संरक्षण तसेच आधुनिक पद्धतीने व्यवसाय कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सराफ व कारागीर बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय ऑनलाईन तसेच परदेशातही विस्तारता येऊ शकतो, याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, सराफ सुवर्णकार बांधवांबद्दलची तळमळ लक्षात घेऊन कपिलजी शर्मा यांची सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या सेमिनारला धाराशिव जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार, कारागीर तसेच बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवसाय कायदेशीर पद्धतीने करावा व एकजूट राखावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सेमिनार यशस्वी करण्यासाठी कपिलजी शर्मा, रामदासजी वंजारी, ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णूदाजी सारडा साहेब तसेच संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आमदार घाडगे पाटील यांनी सर्वांचे कौतुक करत सराफ सुवर्णकार बांधवांना कोणतीही अडचण आल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असल्याचे आश्वासन दिले.


0 Comments