संतापजनक घटना: घरकामाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv District Incident Sexual Assault News

Hot Posts

6/recent/ticker-posts

संतापजनक घटना: घरकामाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv District Incident Sexual Assault News

संतापजनक घटना: घरकामाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv District Incident Sexual Assault News 

धाराशिव  (प्रतिनिधी) : “आई आजारी आहे, घरकामासाठी ये” असा बहाणा करून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील एका गावातील 17 वर्षे 8 महिने वयाच्या पीडित मुलीला (नाव व गाव गोपनीय) आरोपी तरुणाने “माझी आई आजारी आहे, घरकामासाठी ये” असे सांगून आपल्या घरी नेले. त्यानंतर मे 2025 ते 21 जून 2025 या कालावधीत आरोपीने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

ही घटना बराच काळ गुप्त राहिली होती. मात्र, नंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आजोबांनी  यांनी दि.26.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2)(एफ)(एम) सह कलम 4,6,8,12 पोक्सो  अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments