शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; बेदम मारहाणीत एका शेतकऱ्याचा मृत्यू ; नांदेड जिल्ह्यातील घटना-Nanded Murder Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; बेदम मारहाणीत एका शेतकऱ्याचा मृत्यू ; नांदेड जिल्ह्यातील घटना-Nanded Murder Crime News

 शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; बेदम मारहाणीत एका शेतकऱ्याचा मृत्यू ; नांदेड जिल्ह्यातील घटना-Nanded Murder Crime News 


नांदेड : बिलोली तालुक्यातील दुगाव येथे शेतीच्या वादातून एका 56 वर्षीय शेतकऱ्याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना दिनांक 10 रोजी मंगळवारी घडली. व्यंकट विठ्ठलराव जाधव वय 56 राहणार दुगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कुंटुर पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे..

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बिलोली तालुक्यातील दुगाव येथील शेतकरी महादेवराव जाधव यांच्या शेतात दिनांक 10 मंगळवार रोजी शेतात नांगरणी सुरू होती. यावेळी भावकीतील काही व्यक्तींमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर बचाबाची मध्ये झाल यानंतर हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये शेतकरी व्यंकट जाधव यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी माधवराव विठ्ठलराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी व विरुद्ध कोणतं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या घटनेचा कसूर तपास करून पाच आरोपींना बेड्या ठोकले असून त्यांना न्यायालयसमोर हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बालाजी गोविंद जाधव, ज्ञानेश्वर संजय जाधव, शैलेश संजय जाधव, संजय माधवराव जाधव, साईनाथ गोविंद कदम सर्व राहणार दुगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड असे अटकेतील आरोपींची नावे आहेत या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments