मौजे इटकळ येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी.-shre Ram Navami News
""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (प्रतिनिधी – दिनेश सलगरे): मौजे इटकळ येथे यंदाची श्रीराम नवमी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने संपूर्ण परिसरात *“जय श्रीराम” च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दि. २५ मार्च रोजी रात्री श्रीराम मंदिरात अखंड भजनाने झाली. रात्रभर ग्रामस्थांनी भक्तीगीतांचा आनंद घेत सहभाग नोंदवला.गुरुवारी दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करत पाळणा गीत सादर करण्यात आले. यावेळी भगवान श्री राम यांच्या जीवनावर आधारित भक्तीगीते सादर करून वातावरण अधिकच भक्तिमय करण्यात आले.यानंतर महाआरती पार पडली व उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा श्रीराम नवमी उत्सव विशेष आनंददायी व संस्मरणीय ठरला.


0 Comments