🔴 धक्कादायक प्रकार : लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे तरुणीवर लैंगिक अत्याचार, साखरपुड्यानंतर फसवणूक उघड- तुळजापूर तालुक्यातील घटना-Tuljapur Crime News Live
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील एका गावात 21 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी तरुणाविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर पोलीस ठाणे एका गावातील एका तरुणाने सन 2024 पासून ते 2026 पर्यंत आरोपी तरुणाने पीडित तरुणीशी लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्याच दरम्यान आरोपीने दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा केल्याचे उघड झाल्यानंतर पीडितेला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली.
यानंतर पीडित तरुणीने धैर्य दाखवत दिनांक 23 मार्च 2026 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 69 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीसांकडून सुरू असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .अशा प्रकारच्या घटनांमध्ये पीडितांनी घाबरून न जाता तात्काळ पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असल्याचे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.

0 Comments