कळंब तालुक्यात धक्कादायक प्रकार: अल्पवयीन मुलीवर गोडावूनमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार; दोन तरुणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल-Dharashiv Crime News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

कळंब तालुक्यात धक्कादायक प्रकार: अल्पवयीन मुलीवर गोडावूनमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार; दोन तरुणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल-Dharashiv Crime News Live

कळंब तालुक्यात धक्कादायक प्रकार: अल्पवयीन मुलीवर गोडावूनमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार; दोन तरुणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल-Dharashiv Crime News Live

धाराशिव :– कळंब तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेबाबाबत    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी (नाव व गाव गोपनीय) दि. २४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घराजवळील दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी गावातील दोन तरुणांनी तिला “माझ्याशी बोल” असे म्हणत जबरदस्तीने एका गोडावूनमध्ये नेले. तेथे त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.

या घटनेनंतर पीडित मुलीने दि. २६ एप्रिल २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार (प्रथम खबर) दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ४९, ३(५) तसेच पोस्को (POCSO) कायद्याच्या कलम ४, ५(एम) व ६ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

0 Comments