लग्नाचे आमिष, छायाचित्र व्हायरलची धमकी; ५ वर्षे तरुणीवर लैंगिक अत्याचार”-Dharashiv Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

लग्नाचे आमिष, छायाचित्र व्हायरलची धमकी; ५ वर्षे तरुणीवर लैंगिक अत्याचार”-Dharashiv Crime News

लग्नाचे आमिष, छायाचित्र व्हायरलची धमकी; ५ वर्षे तरुणीवर लैंगिक अत्याचार”-Dharashiv Crime News 


धाराशिव  (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणीवर तब्बल पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी (नाव गोपनीय) हिच्यावर दि. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत आरोपी तरुणाने वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. आरोपी तिला विविध ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.

इतकेच नव्हे, तर “तुझ्या आई-वडिलांना सांगितल्यास तुझे छायाचित्र व्हायरल करीन” अशी धमकी देऊन आरोपीने पीडितेला गप्प ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या भीती आणि छळामुळे पीडिता बराच काळ मौन बाळगून होती.

अखेर धैर्य एकवटून पीडितेने दि. २७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(i), ६४(२)(म), ६९, ३५१(२)(३), ३(५) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (POCSO) कायदा कलम ४(२), ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीसांकडून सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

0 Comments