संतापजनक घटना: तिळगुळाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; फोटो व्हायरलची धमकी देत महिनोनमहिने शोषण, धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv District Incident Crime News
धाराशिव (प्रतिनिधी) : वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर तिळगुळ देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दीर्घकाळ गप्प बसण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.
या घटनेबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका गावातील १७ वर्षीय मुलगी दि. १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी शेतात असताना, त्याच गावातील एका तरुणाने तिला तिळगुळ देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले. तिला तिळगुळ खायला दिल्यानंतर तिला चक्कर आल्याचा फायदा घेत आरोपीने तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकी देत, “घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही तसेच तुझे छायाचित्र व्हायरल करीन,” अशी भीती दाखवली. या धमकीमुळे पीडिता तब्बल काही महिने गप्प राहिली. मात्र, अखेर धाडस करून तिने दि. २९ एप्रिल २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली.
पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 64(2)(एम), 137(2), 127(3), 78, 115, 351(2) तसेच पोस्को कायद्यातील कलम 4, 6, 8, 12 अन्वये गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

0 Comments