तुळजापुरात ‘सोने देण्याच्या’ आमिषाने महिलेला गंडा; हजारांचे दागिने लंपास'-Tuljapur Crime
तुळजापूर (प्रतिनिधी) : तुळजापूर शहरात पुन्हा एकदा ‘सोने देण्याच्या आमिषाने फसवणूक’ करणाऱ्या भामट्यांचा प्रकार समोर आला आहे. कुंभारी येथील एका महिलेची तब्बल 27 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनिता रविंद्र तांबे (वय 56 वर्षे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दि. 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10.15 वाजता तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयासमोरील फुटपाथवर उभ्या होत्या. यावेळी अनोळखी दोन इसमांनी त्यांच्याशी संवाद साधत 10 ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवले.
या भामट्यांनी सोने असल्याचा भास निर्माण करण्यासाठी सोनेरी रंग लावलेली लोखंडी पट्टी फिर्यादीस दिली. त्याबदल्यात विश्वास संपादन करून फिर्यादीच्या कानातील सुमारे 4.8 ग्रॅम वजनाचे फुल-झुमके (अंदाजे किंमत 27,000 रुपये) घेऊन ते दोघे इसम तेथून पसार झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिता तांबे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं. कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
🔎 पोलिसांकडून तपास सुरू असून नागरिकांना आवाहन
या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

0 Comments