लग्नाचे आमिष दाखवून तरुणीकडे लैंगिक अत्याचार; धमक्या व मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
नळदुर्ग : लग्नाचे आमिष दाखवून एका 21 वर्षीय तरुणीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच धमक्या व मारहाणीच्या आरोपावरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील 21 वर्षीय पीडित तरुणीची ओळख आरोपी तरुणाशी झाली होती. आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत माहे ऑक्टोबर 2022 पासून ते 1 एप्रिल 2026 पर्यंत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, नंतर लग्न करण्यास नकार देत तिची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच, पीडितेने या घटनेची माहिती कोणाला दिल्यास तुला व तुझ्या आई-भावाला जिवे मारून टाकू, अशी धमकी आरोपीने दिल्याचे सांगण्यात आले आहे. याचबरोबर आरोपीच्या काही नातेवाईकांनी पीडितेला मारहाण केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने 15 मे 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 69, 318(4), 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments