शेत नांगरणीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; दागिने हिसकावल्याचा आरोप-चार जणांवर गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेत नांगरणीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; दागिने हिसकावल्याचा आरोप-चार जणांवर गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-

शेत नांगरणीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; दागिने हिसकावल्याचा आरोप-चार जणांवर गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv District Incident Crime News 


भुम : तालुक्यातील दुधोडी येथे शेत नांगरणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबातील चार जणांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुम पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल रावण महानवर, संगिता रावण महानवर (रा. दुधोडी ता. भुम), माउली संदीपान महानवर (रा. बावी ता. भुम) व बबलु संजय तांबे (रा. हाळगाव ता. जामखेड जि. बीड) यांनी दि. १८ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुधोडी येथील शेत नंबर ३५ च्या बांधावर फिर्यादी मिनिनाथ अजिनाथ महानवर (वय ३५) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

फिर्यादी मिनिनाथ महानवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेत नांगरणीच्या कारणावरून आरोपींनी त्यांना व त्यांच्या आई सिंधुबाई महानवर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, काठी व खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे भाऊ रमेश महानवर व वहिनी अश्विनी महानवर यांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी आरोपींनी अश्विनी महानवर यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण तसेच दीड तोळ्यांचे कानातील झुमके जबरदस्तीने ओढून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मिनिनाथ महानवर यांनी दि. २१ मे २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून भुम पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 119(2), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments