दुर्दैवी घटना : विजेच्या शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Accident News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : विजेच्या शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Accident News Live

दुर्दैवी घटना : विजेच्या शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू धाराशिव जिल्ह्यातील घटना


धाराशिव : परंडा तालुक्यातील कपिलपुरी येथे शुक्रवार दिनांक 29 रोजी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे .नदीतील विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढताना विजेचा जबर शॉक लागून या दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला . ही हृदय द्रावक घटना शुक्रवार दिनांक 29 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की परंडा तालुक्यातील कपिल पुरी येथील शेतकरी अनिल देवळकर जैन यांच्या शेतातील विद्युत पंपात बिघाड झाला होता नदीतील हा विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अनिल जैन वय(६४) व अक्षय कुंभार वय 30 ते दोघे पाण्यात उतरले होते यावेळी अचानक विजेचा जोराचा धक्का बसल्याने या दोघांचाही जागीच मृत्यू झाला .या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे कपिल पुरी गावासह परिसरात शोककळा पसरली  असून सर्वत्र हळहळ  व्यक्त केली जात आहे .रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Post a Comment

0 Comments